कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकाला शैक्षणिक खर्चासाठी लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकाला शैक्षणिक खर्चासाठी  

लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

            लातूर,दि.17(जिमाका)-मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कोरोना प्रादुर्भावाने आई, वडील अथवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकाच्या शैक्षणिक खर्चासाठी लातूर जिल्हयाकरिता बालनिधी प्राप्त झालेला असून सदर निधीचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता लातूर जिल्ह्यातील कोविड -19 मुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या वयोगट 3 ते 18 बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी वितरीत करावयाचा असल्याने पात्र लाभार्थी यांनी  पुढील अभिलेखे लातूका स्तरावर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सात दिवसात सादर करावेत असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी,लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

सोबत :- अर्थसहाय्य्‍ मिळण्याकरिता आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे ते पूढील प्रमाणे आहे. अर्ज, बालकाचे शाळेचे बोनाफाईड, आई / वडील कोविड पॉझिटीव्ह असल्याबाबतचा पुरावा झेरॉक्स प्रत,आई / वडील मृत्यु दाखला झेरॉक्स प्रत, बालक अथवा बालक पालक संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते असले बाबत बँकेचे पास बुक झेरॉक्स प्रत,बालकाचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत असे कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.

                                                 0000

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा