कडबाकुट्टी सयंत्र, ओपनवेल विद्युत पंप, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकन यंत्र 50 टक्के अनुदानावर

 

कडबाकुट्टी सयंत्र, ओपनवेल विद्युत पंप, सोयाबीन

स्पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकन यंत्र 50 टक्के अनुदानावर

 

*लातूर,दि.16(जिमाका):-* लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, जिल्हा परिषद लातूर सेश फंडातून कडबाकुट्टी सयंत्र, ओपनवेल विद्युत पंप, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकन यंत्र 50 टक्के अनुदानावर डिबीटी तत्वावर देण्यात येणार आहेत. या योजनेमध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व महिला यांना प्राधान्य राहील. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी स्वत:चा सातबारा, आठ -अ, आधार कार्ड,बँक पासबुकाच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स लाभार्थी अनु.जाती,अनु. जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतिसह आपल्या पंचायत समिती कडे अर्ज करावेत. लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडकडून आपल्या पसंतीच्या औजाराची खरेदी करावी लागेल.

सदर खरेदी करावयाचे औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परिक्षण करुन ते बी.आय.सी. अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार / तांत्रीक निकषानुसार असावे लागेल. सदर औजारासाठी जास्तीचे अर्ज प्राप्त झाल्यास लक्षांकानुसार सोडत पध्दतीने लाभार्थ्यांची निवड संबंधीत पंचायत समिती स्तरावर करण्यात येईल. मंजुर औजाराचे अनुदान संबंधीत शेतकऱ्याच्या आधार लींक असलेल्या बँक खात्यावर डिबीटी प्रणालीव्दारे अदा करण्यात येईल.

तरी इच्छुक शेतकऱ्यांनी 30 जून 2022 पर्यंत आपल्या पंचायत समिती कार्यालयांकडे परिपुर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत असे आवाहन कृषि विकास अधिकारी व अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद लातूर यांनी केले आहे.

                                              000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा