सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रीय पोर्टल तृतीय पंथी व्यक्तींना अर्ज करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध

 

सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रीय पोर्टल

तृतीय पंथी व्यक्तींना अर्ज करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध

 

             *लातूर,दि.13 (जिमाका):-*  सामाजिक न्‍याय व अधिकारीता मंत्रालय,  भारत सरकार, नवी दिल्‍ली यांचेकडून तृतीयपंथीय व्‍यक्‍तींसाठी https:transgender.dosje.gov.in  हे राष्‍ट्रीय पोर्टल सुरु करण्‍यात आलेले आहे.  या पोर्टलवर तृतीयपंथी व्‍यक्‍तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी अर्ज करण्‍याबाबतची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेली आहे. 

            राज्‍यातील तृतीयपंथीय व्‍यक्‍तींची निश्‍चीत आकडेवारी उपलब्‍ध नसल्‍याने त्‍यांचेसाठी नाविन्‍यपुर्ण व कौशल्‍य विकासाच्‍या योजना राबविण्‍यास अडचणी निर्माण होत आहे.  त्‍यासाठी तृतीयपंथीय व्‍यक्‍तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी एकदिवशी शिबीराचे आयोजन दिनांक 9 जून 2022 रोजी सहायक आयुक्‍त समाज कल्‍याण लातूर व एकता बहुउद्देशिय महिला मंडळ ता. जि. लातूर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने स्‍थळ सामाजिक न्‍याय भवन, आडत लाईन, शिवनेरी गेट च्‍या समोर  लातूर येथे करण्‍यात आले होते.        

            त्‍यानुसार लातूर जिल्‍ह्यातील ज्‍या तृतीयपंथीयांनी https:transgender.dosje.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. अशा तृतीयपंथीयांनी व ज्‍यांनी नोंदणी केलेली नाही अशा तृतीयपंथीयांनी सदर शिबीरात सहभाग नोंदविला आहे. ज्‍या तृतीयपंथीयांनी अद्याप ऑनलाईन नोंदणी केलेली नाही अशांनी त्‍यांचे कागदपत्रे  (आधारकार्ड झेरॉक्‍स प्रत, पासपोर्ट साईज फोटो, 100 रु. बॅंड पेपर) इत्‍यादी सहायक आयुक्‍त समाज कल्‍याण लातूर कार्यालयात जमा केलेले आहेत, त्‍यांना तृतीयपंथी असल्या बाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्‍ध करुन देण्‍याची कार्यवाही चालू आहे.  तसेच जिल्‍ह्यातील जास्‍तीत जास्‍त तृतीयपंथीयांनी https:transgender.dosje.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुन घ्‍यावी असे आवाहन कार्यक्रमाचे अध्‍यक्ष  पी. व्‍ही. डाके (सहाय्यक संचालक वित्‍त व लेखा) प्रादेशिक उपायुक्‍त समाज कल्‍याण कार्यालय लातूर  यांनी केले.

            शिबीराच्‍या अध्‍यक्षस्‍थानी पी. व्‍ही. डाके (सहाय्यक संचालक वित्‍त व लेखा)  हे उपस्थित होते.  तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन एन. एस. सकट (लेखाधिकारी) हे उपस्थित होते.  तसेच सहायक आयुक्‍त समाज कल्‍याण कार्यालयातील  डी. के. राऊत (सहाय्यक लेखाधिकारी), श्रीमती. ए. एस. लाखाडे (कार्यालयीन अधिक्षक), बी. एस. केंद्रे (समाज कल्‍याण निरिक्षक) एस. के. घुगे (समाज कल्‍याण निरिक्षक), एस. डी. पांढरे (कनिष्‍ठ लिपीक) इत्‍यादी उपस्थित होते.  तसेच या शिबीरास श्रीमती प्रिती माऊली लातूरकर सदस्या जिल्‍हास्‍तरीय तृतीयपंथी तक्रार निवारण समिती लातूर,  श्रीमती मनिषा राजेंद्र होलकुंदे  अध्‍यक्षा एकता बहुउद्देशिय महिला मंडळ ता. जि. लातूर व नवनाथ शाहीर अध्‍यक्ष कल्‍याणी सेवाभावी संस्‍था बीड हे या कार्यक्रमास  उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिंदे (तालुकासमन्‍वयक) यांनी केले.

 

                                                                  0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा