पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटरनी नोंदणी केल्या शिवाय सेंटर सुरु ठेवू नये
पेट शॉप व डॉग
ब्रिडिंग सेंटरनी नोंदणी केल्या
शिवाय सेंटर सुरु ठेवू नये
*लातूर,दि.13 (जिमाका):-* माहे ऑगस्ट
2020 मध्ये सर्व पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर यांना महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळामार्फत
नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक होते. परंतु अद्याप पर्यंत बहुतांश पेट
शॉप व ब्रिडींग सेंटरनी महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी न करताच त्यांनी
पेट शॉप व डॉग ब्रिडींग सुरुच ठेवलेली आहेत.
लातूर जिल्ह्यातील सर्व पेट शॉप व डॉग ब्रिडींग
सेंटर यांना कळविण्यात येते की, पाळीव प्राणी दुकान नियम, 2018 आणि श्वान प्रजनन व
विपणन नियम, 2017 या नियमातील तरतुदी नुसार पाळीव प्राण्याची दुकाने तसेच श्वान प्रजनन
व विनणन केंद्राची महारार्ष्ट प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक असल्याने
यापुढे कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रिडींग सेंटर नोंदणी केल्याशिवाय चालू ठेवता येणार
नाहीत याची गांभिर्यांने नोंद घेण्यात यावी. व तात्काळ महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे
नोंदणी करुन घेण्यात यावी असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment