धनगर समाजातील विद्यार्थ्याना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी मध्ये शिक्षणासाठी अर्ज करावे

                                  धनगर समाजातील विद्यार्थ्याना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या

नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी मध्ये  शिक्षणासाठी अर्ज करावे

*लातूर,दि.22(जिमाका)-*महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहूजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये  शिक्षण  देण्याची योजना सुरू करण्यात आलेले असून सदर योजनेमध्ये लातूर  जिल्ह्यातील 1. साबरमती द ग्लोबल स्कूल, बुधोडा ता.औसा जि. लातूर 2. आबासाहेब इंग्लिश स्कुल ता.देवणी जि.लातूर 3. सम्राट चंद्र गुप्त मौर्य इंटरनॅशलन स्कुल रुध्दा ता.अहमदपूर जि.लातूर या तिन  शाळेची  निवड झालेली आहे.

या  शाळेमध्ये या योजनेतील प्रवेशित  विद्यार्थ्यांना शासन  निर्णय दिनांक 04 सप्टेंबर 2021  अन्वये देण्यात आलेल्या सोई-सुविधा मोफत उपलब्ध असून सदर शाळेत या योजनेतंर्गत  अर्ज करणे करिता दिनांक 30 जून 2022  पर्यंत प्रवेश घेणेकरिता  सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर या कार्यालयाकडे  लेखी  स्वरूपात अर्ज  करण्यात यावेत.

अर्ज  सहायक आयुक्त,समाज कल्याण लातूर या कार्यालयात तसेच  लातूर जिल्हयातील तालुका स्तरावरील  शासकीय वसतीगृहात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी  श्रीमती.प्रणिता सुर्यवंशी  यांचे भ्रमनध्वनी नंबर 7972535516  संपर्क करावा. या योजनेतंर्गत उपरोक्त शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरीता पूढील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

 या  योजनेकरिता विद्यार्थी   शैक्षणिक वर्ष  2021-22 मध्ये इयत्ता पहीली  किंवा दुसरी  मध्ये   शिक्षण  घेणारा असावा 2. विहित नमुन्यातील अर्ज (या कार्यालयात तसेच  तालुकास्तरीय शासकीय वसतीगृहात उपलब्ध  आहेत) 3. जातीचा दाखला 4. जन्माचा दाखला 5. पालकाचे उत्पन्न  ( एक लाखाचे आत असावे) सदर अटीची पुर्तत: करत असलेल्या धनगर समाजातील  जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण शिवकांत चिकुर्ते यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु