विधान मंडळ विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितींने जिल्ह्यातील विविध विभागांचा घेतला आढावा;जिल्ह्यातील विविध कामांची केली पाहणी

 

विधान मंडळ विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितींने

जिल्ह्यातील विविध विभागांचा घेतला आढावा;जिल्ह्यातील विविध कामांची केली पाहणी


लातूर,दि.2 (जिमाका):- विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती महाराष्ट्र विधान मंडळ यांचा लातूर जिल्हा दौरा सुरु असून या समितीचे अध्यक्ष आमदार शांताराम मोरे, समितीचे सदस्य आमदार  रोहित पवार , आमदार रत्नाकर गुट्टे यांनी नुकताच दिनांक 1 जून, 2022 रोजी विविध विभागांचा शासकीय विश्रामगृह , लातूर येथे आढावा घेतला.


यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, विधानमंडळाचे अवर सचिव मंगेश पिसाळ, विधान मंडळाचे कक्ष अधिकारी विनोद राठोड तसेच विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.


यावेळी समितीने पोलीस अधीक्षक कार्यालय, महानगरपालिका, जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा व नगर पंचायती, प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा उद्योग केंद्र , जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, पशुसंवर्धन कार्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ, कार्यकारी अभियंता अधीक्षक ,सार्वजनिक बांधकाम विभाग, लातूर यांच्या आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी , कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण व अनुशेष तसेच वसंतराव नाईक महामंडळ, लातूर जिल्हाधिकारी कार्यालय, जात पडताळणी तसेच जिल्हा परिषद कार्यालय, उपायुक्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, लातूर यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी, कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण व अनुशेष, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाकरिता राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत आढावा घेतला.

          दिनांक १ जून,  2022 रोजी समितीने लातूरच्या नाविण्यपूर्ण अशा उमंग सेंटरला भेट दिली. उदगीरकडे प्रयाण करुन त्यानंतर बोरतळ पाटी येथील शंकर नगर माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळेला भेट दिली . त्यानंतर स्वामी विवेकानंद स्कूल येथे भेट देवून त्यानंतर नाईक नगर येथील अव्वलकोंडा आश्रम शाळेला भेट. त्यानंतर उदगीर नगर परिषदेच्या कामांची पाहणी केली. तसेच मादलापूर तांडावरती काम व आश्रम शाळा भेट दिली.

दिनांक 2 जून, 2022 रोजी लातूर येथील स्वामी विवेकानंद स्कूलला भेट. होळकर वस्ती काटगांव येथे भेट प्राथमिक आश्रमशाळा काटगाव येथे भेट दिली.

          कृष्णनगर वाडी तांडा, पांडूरंग तांडा येथील विविध कामांची पाहणी व भेट . तसेच वसंतनगर तांडा येथील कामांची पाहणी त्यानंतर आश्रमशाळा पिंपळगाव अंबा येथे भेट दिली. विमुक्त जाती, भटक्या जमाती वसतीगृह कानडी बोरगाव येथे जावून समितीने पाहणी केली.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा