सैनिक हवालदार तेलंगे सुर्यकांत शेषेराव यांना थेरगावच्या नागरिकांनी दिला, शोकाकुल वातावरणात निरोप शासकीय इतमामात झाला अंत्यसंस्कार

 

*सैनिक हवालदार तेलंगे सुर्यकांत शेषेराव यांना थेरगावच्या नागरिकांनी दिला,*

*शोकाकुल वातावरणात निरोप*

*शासकीय इतमामात झाला अंत्यसंस्कार*

 

        *लातूर, दि.29 (जिमाका):-

*भारतीय सैन्यातील ब्रिगेड ऑफ दि गार्डस रेजिमेंट मधील 15 गार्डस बटालियनचे सेवारत सैनिक नंबर 15621167F हवालदार तेलंगे सुर्यकांत शेषेराव गाव थेरगाव ता. शिरुर अनंतपाळ जि. लातूर हे कर्तव्य बजावताना दिनांक 27 जून,2022 रोजी दुर्देवी घटनेमध्ये जखमी (Gun Shot Injury)  होऊन 167 मिल्ट्री हॉस्पीटल पठाणकोट येथे दिनांक 27 जून, 2022 रोजी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव अमृतसर येथून दिनांक 28 जून, 2022 रोजी हवाई विमानाने निघून पुणे येथे व तेथून  रस्ता मार्गे शिरूर अनंतपाळ तालुक्यातील थेरगाव येथे आणण्यात आले आणि अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, त्यानंतर थेरगावच्या नागरिकांनी तेलंगे सुर्यकांत शेषेराव पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.  यावेळी पोलीस प्रशासनाच्यावतीने बंदुकीच्या चार फेरी सलामी  व मानवंदना देण्यात आली.

             तेलंगे सुर्यकांत शेषेराव यांचे वडील शेषेराव नारायण तेलंगे व त्यांची आई त्रिवेणाबाई शेषेराव तेलंगे, तेलंगे सुर्यकांत शेषेराव यांच्या पश्चात त्यांची पत्नी मनिषा सुर्यंकांत तेलंगे व मुले कु. वेदांत सुर्यकांत तेलंगे, कु. आयुष सुर्यकांत तेलंगे असा त्यांचा परिवार आहे.

            याप्रसंगी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी लिखित शोकसंदेश पाठवला त्यात त्यांनी,तेलंगे सुर्यकांत शेषेराव हे लातूर जिल्ह्याचे सुपूत्र होते. त्यांच्या जाण्याने लातूरच्या वैभवातील मानाचा तुरा गेल्याचे त्यात म्हटले आहे. आम्ही आपल्या तेलंगे परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.  या शोक संदेशाचे अभय सांळुखे यांनी वाचन केले.

             यावेळी लातूरचे खासदार सुधाकर श्रुंगारे, माजी खासदार श्रीमती रुपाताई पाटील, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, शिरूर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जटाळे, गटविकास अधिकारी पंकज चव्हाण, कंमाडंट एमआयसी अँन्ड सी चे प्रतिनिधी सुभेदार आर. के. यादव, मॅक ग्रुपचे कंमांडर प्रतिनिधी हवालदार जी.आर.एस. रेड्डी तसेच राजवीर सिंग, तसेच जिल्हा प्रशासनातील विभाग प्रमुखांची तसेच समस्त गावकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.










 


                                             

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा