नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत लाभ घेण्यासाठी डिबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत लाभ घेण्यासाठी

डिबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

 

    *लातूर,दि.29 (जिमाका):-*कृषि विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यीत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत   जिल्हातील हवामान बदलामूळे उदभवलेल्या परिस्थितीशी जूळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करणे, शेतक-यांना शेती पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने जिल्हातील 282 गावांमध्ये सन 2018-19 पासून प्रकल्पाची अंमलबजावणी सूरू आहे. प्रकल्पाअंतर्गत वैयक्तीक लाभाचे घटक फळबाग लागवड, बांबू लागवड, वृक्ष लागवड, हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बिजोत्पादन, रेशीम उदयोग, मधूमक्षिका पालन, नाडेप/ गांडूळ खत युनिट, विहिर पुनर्भरण, गोडया पाण्यातील मत्स्य पालन, परसबागेतील कुक्कुटपालन, वैयक्तिक शेततळे (इनलेट व आऊटलेटसह / अस्तरीकरणासह), शेततळे अस्तरीकरण, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, शेडनेट हाऊस, पॉलिहाऊस/पॉलिटनेल इत्यादी वैयक्तीक घटकांचे अर्ज घेणे चालू आहे. 

 प्रकल्पांतर्गत वरील नमुद केलेल्या घटकांचा लाभ घेण्याकरीता इच्छूक असलेल्या शेतकरी बांधवांनी प्रकल्पाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर (https://dbt.mahapocra.gov.in)ú नोंदणी करावी. नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये संबंधीत शेतक-यांचे आधारकार्ड, सातबारा उतारा, व आठ-अ, मोबाईल क्रमांक, अर्जदार अनुसुचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र, अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे.

एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ठ प्रत्येक बाबीकरीता स्वतंत्र अर्ज करावा. अधिक माहीतीसाठी प्रकल्पात समाविष्ठ गावातील संबंधीत कृषि सहाय्यक किंवा समुह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डि. एस. गावसाने, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

                                                 0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा