अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या परिमाणात बदल

 

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या परिमाणात बदल

           *लातूर,दि.8,(जिमाका):-*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी माहे मे-2022 ते सप्टेंबर-2022  करीता अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांसाठी प्रती सदरस्य 5 किलो मोफत अन्नधान्य वितरीत करण्यासाठी शासनाकडून दि. 5 मे 2022 च्या पत्रानुसार सुधारित नियतन प्राप्त झाले आहे.

        सुधारीत नियतनानुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या परिमाणात बदल करण्यात आलेला आहे. माहे मे-2022 ते सप्टेंबर -2022 या कालावधीसाठी अंत्योदय योजनेचे परिमाण गहू 2 किलो प्रती सदस्य व तांदुळ 3 किलो प्रती सदस्य असे देण्यात आले आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे परिमाण गहू 1 किलो प्रती सदस्य व तांदूळ 4 किलो सदस्य असे देण्यात आले आहे.PMGKAY योजनेचे धान्य पात्र लाभार्थ्यांना मोफत वितरित करावयाचे आहे.

        प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचे परिमाण माहे मे-2022 ते सप्टेंबर-2022 पूढील प्रमाणे आहे. योजना, सध्याचे परिमाण व सुधारित परिमाण (मे-2022 ते सप्टेंबर-2022) योजना- (PMGKAY) अंत्योदय, गहू- 3 किलो / सदस्य, तांदूळ -2 किलो/ सदस्य, गहू-2 किलो/ सदस्य, तांदूळ 3 किलो/ सदस्य, (PMGKAY) प्राधान्य कुटुंब लाभार्थी- गहू- 3 किलो/ सदस्य, तांदूळ- 2 किलो / सदस्य, गहू- 1 किलो / सदस्य, तांदूळ- 4 किलो / सदस्य.

         तसेच शासनाचे पत्र दिनांक 18 मे 2022 अन्वये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या परिमाणात बदल करण्यता आलेला आहे. माहे जून-2022 ते माहे मार्च-2023 या कालावधीसाठी अंत्योदय येाजनेचे परिमाण गहू 15 किलो प्रती कार्ड व तांदूळ 20 किलो प्रती कार्ड असे देण्यात आले आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे परिमाण गहू 2 किलो प्रती सदस्य व तांदूळ 3 किलो प्रती सदस्य असे देण्यात आले आहे.

       अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे परिमाण माहे जून-2022 ते मार्च-2023 पूढील प्रमाणे आहे. योजना, सध्याचे परिमाण  (जून-2022 ते मार्च-2023) योजना- अंत्योदय योजना गहू-20 किलो / कार्ड, तांदूळ- 15 किलो / कार्ड, गहू- 15 किलो / कार्ड व तांदूळ- 20 किलो / कार्ड, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना- 3 किलो / सदस्य, तांदूळ- 2 किलो / सदस्य, गहू- 2 किलो / सदस्य व तांदूळ- 3 किलो / सदस्य, व धान्याचे वितरण गहू -2 रु. प्रती किलो व तांदूळ 3 रु. प्रती किलो या प्रमाणे करण्यात यावे असे  जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                     0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा