जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रभाग भौगोलिक सीमा निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रभाग भौगोलिक
सीमा
निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर
*लातूर,दि.29 (जिमाका):-* मा. राज्य
निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेश. रानिआ / जिपपंस 2021/ प्र.क्र.10/ का-7 दि -10.05.2022 अन्वये दिलेल्या कार्यक्रमांनुसार लातूर जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या
66 जागा व त्याअंतर्गत
असलेल्या सर्व पंचायत
समित्यांच्या 132
जागांच्या निवडणुकांकरिता प्रभागाच्या भौगोलिक सिमा निश्चित करणेबाबतचा
कार्यक्रम दिलेला आहे. त्यानुसार दिनांक 27 जून 2022
रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसुचना प्रसिध्द केलेली आहे. सदरील अधिसुचना ही
महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961
(1962 चा अधिनियम
(5) चे कलम 12 पोटकलम (1) अन्वये लातूर जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय
लातूर, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालय, सर्व तहसिल
कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालय येथील फलकावर पाहण्यासाठी
उपलब्ध केलेली आहे.
अंतीम प्रभाग रचनेचे अवलोकन सर्व संबंधितानी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
0000
Comments
Post a Comment