महाबीज मार्फत सोयाबीन, उडीद, ज्युट वाणाचे बिजोत्पादन कार्यक्रम जाहीर

 

महाबीज मार्फत सोयाबीन, उडीद,

ज्युट वाणाचे बिजोत्पादन कार्यक्रम जाहीर

           लातूर,दि.17 (जिमाका)- खरीप 2022-23 हंगामासाठी महाबीज मार्फत सोयाबीन MAUS-162, MAUS-71.उडीद AKU-10-01 व ज्युट JRO-524 या पीक वाणाचे बिजोत्पादन कार्यक्रम उपलब्ध आहे. सदरील बिजोत्पादन कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य  या धर्तीवर बिजोत्पादन कार्यक्रम देण्यात येईल. सदरील बिजोत्पादन कार्यक्रमासाठी एका गावाज कमीत कमी सर्व पीक वाण मिळून 25 एकर क्षेत्र होणे आवश्यक आहे. महाबीजचे बियाणे खरेदी धोरण व ईतर अटी मान्य असलेल्या बिजोत्पादकांना बिजोत्पादन कार्यक्रम देण्यात येईल. तसेच बिजोत्पादक कार्यक्रम आंवटीत करण्याचा आधिकार महाबीजकडे राखीव ठेवण्यात आला आहे. एका बिजोत्पादकास एकाच पिकाचे एकाच वाणाचाच बिजोत्पादन कार्यक्रम घेता येईल. बिजोत्पादक कार्यक्रम घेण्यासाठी तीन महिण्याच्या आतील सातबारा व आठ अ चा उतारा,आधार कार्डाची झेरॉक्स प्रत प आधार कार्ड लिंक असलेल्या बँक पासबुक IFSC CODE असलेली झेरॉक्स प्रत जोडून मागणी अर्ज भरून बिजोत्पादन कार्यक्रम घेता येईल. त्यासाठी बिजोत्पादन शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील कृषी क्षेत्र अधिकारी यांना जिल्हा कार्यालय महाबीज,कृषी उत्पन्न्‍ बाजार समिती,तळ मजला मार्केट यार्ड,शिवनेरी गेट लातूर,येथे व अहमदपूर,उदगीर,जळकोट या तालुक्यातील शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केंद्र ग्राम पंचायत गोदाम शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातृर येथे संपर्क करून वरीलप्रमाणे कागदपत्र सादर करून बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यात यावा.तसेच बिजोत्पादन कार्यक्रम उपलब्ध असे पर्यंतच देण्यात येईल.याची नोंद घेण्यात यावी. तरी सर्व बिजोत्पादकांनी महाबीजच्या खरीप 2022-23 हंगामाचे बिजोत्पादन कार्यक्रम घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाबीज यांनी केले आहे.

                                                           000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा