अनोळखी व्यक्ति मृत अवस्थेत आढळली, मृत व्यक्तीची माहिती असल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन

 

अनोळखी व्यक्ति मृत अवस्थेत आढळली,

मृत व्यक्तीची माहिती असल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन

लातूर,दि.17(जिमाका)- एक अनोळखी पुरुष जातीचे  इसम वय अंदाजे 45 वर्ष यास मृत अवस्थेत स.द. लातूर येथे ईसम नामे प्रतिक मनोज राजे यांनी दाखल केले असल्याने एमएलसी नंबर 6899/पीएबी/2022 प्रमाणे दि.13 जून 2022 रोजी प्रमाणे पी.एम.करण्याकामी सदरची एमएलसी पोना/ 1607 आय.बी.शेख ने पोस्टे गांधी चौक लातूर यांनी पो.स्टे विवेकानंद चौक, लातूर येथे रिर्पोटसह हजर केल्याने पो.स्टे.विवेकानंद चौक लातूर येथे आ.मृ.नं.47/2022 कलम 174 सीआरपी प्रमाणे दाखल करून पुढील कार्यवाही कामी आमच्याकडे दिल्याने आम्ही लागलीच स.द. लातूर येथे रवाना होऊन सदर मयताचे फोटो काढुन त्याचेवर स.द. लातूर येथे शवगृहात ईन्क्वेस्ट पंचनाता भरून,वैद्यकिय अधिकारी लातूर यांचे मार्फत पी.एम.करून घेऊन सर्व पो.स्टे ला संदेश करून माहिती घेण्याचा प्रयत्न्‍ केला आहे.

अनोळखी मयताचे वर्णन पूढीलप्रमाणे आहे- अनोळखी मयत पुरूष जातीचे अंदाजे वय- 45, रंग- सावळा, दाढीस पांढरे केस, अंगात- खाकी रंगाची पँट, निळसर रंगाची अंडरवियर,निळसर राखाडी रंगाचा टी.शर्ट त्यावर डाव्या छातीवर महाराष्ट्र्र पोलीसाचा लोबो, पायात पांढऱ्या रंगाची जीएएससीओ कंपनीची स्लीपर चप्प्ल,गळयात-रंगबेरंगी दोरा,उंची -अंदाजे 165 से.मी.अशा वर्णनाचा आहे.

वरील वर्णनाचा अज्ञात  मयत पुरूषाची माहिती मिळाल्यास सदरील पो.स्टे.ला माहिती दयावे असे पोलीस चौकशी अंमलदार पोलीस स्टेशन विवेकानंद चौक, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. संपर्क:-पोहेकॉ/1303 देमगुंडे,मो.नं. 9421784819, पो.स्टे विवेकानंद चौक,लातूर 02382-258100 असा आहे.

                                                000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु