*बहुजन कल्याण मंत्रालयाच्या ‘महात्मा ज्येाती’ संस्थेतर्फे ‘तृतीय रत्न’ या* *नाटकाचे 3 जून रोजी लातूर मध्ये निशुल्क प्रयोग*

 

*बहुजन कल्याण मंत्रालयाच्या ‘महात्मा ज्येाती’ संस्थेतर्फे ‘तृतीय रत्न’ या* *नाटकाचे 3 जून रोजी लातूर मध्ये निशुल्क प्रयोग*

        *लातूर,दि.2 (जिमाका):-* लातूर येथील दगडोजीराव देशमुख नाट्यगृहात दिनांक 3 जून 2022 ला सायंकाळी 6 वाजता ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात येत आहे. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणिक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने मंत्री इतर मागास बहुजन कल्याण विभाग तथा महाज्योतीचे अध्यक्ष श्री. विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, श्री. लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोग करण्याचे योजिले आहे.

अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रीएटीव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. एकुण ३० कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. याआधी विविध जिल्ह्यात पंचवीस प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांनी केले आहे.

बहुजन कल्याण विकास मंत्रालयाच्या महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँन्ड ट्रेनिंग इन्स्टेटयूट (महात्मा ज्योती) संस्थेच्या वतीन तृतीय रत्न या नाटय प्रयोगाचे आयोजन ‘दगडोजीराव देशमुख नाटयगृहात’ 3 जून रोजी सायंकाळी 6 वाजता निशुल्क प्रयोग ठेवण्यात आला आहे. अधिकाधिक लोकांनी हा प्रयोग पहावा असे आवाहन महात्मा ज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केले आहे.





 

                                                 000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु