1 जुलै "कृषि दिन" म्हणुन साजरा करण्याचे कृषि विभागाचे आवाहन
1
जुलै "कृषि दिन"
म्हणुन साजरा करण्याचे
कृषि विभागाचे आवाहन
*लातूर,दि.30(जिमाका):-*महाराष्ट्राचे
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व कृषि संजिवनी मोहीम
सप्ताहाची सांगता म्हणून 1 जुलै 2022
रोजी लातूर
जिल्ह्यामध्ये कृषि दिन साजरा करण्यात येणार आहे.
त्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद लातूर
येथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रशांत पाटील, गाव - अंकलकोप ता. पलुस जिल्हा
सांगली यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मार्गदर्शक प्रशांत पाटील
हे सोयाबीन पिकाचे टोकण पद्धतीने एकरी 28 क्विंटल उत्पादन घेणारे शेतकरी आहेत.
तरी जिल्हातील सर्व शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment