उद्यमिता यात्रेचे लातूर जिल्ह्यात आगमन तीन दिवस मोफत व्यवसाय विकास प्रशिक्षण संपन्न

 

उद्यमिता यात्रेचे लातूर जिल्ह्यात आगमन

तीन दिवस मोफत व्यवसाय विकास प्रशिक्षण संपन्न

 

         *लातूर,दि.13 (जिमाका):-*  महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि युथ एड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेली राज्यव्यापी उद्यमिता यात्रा दिनांक 9 जून रोजी लातूर येथे पोहचली. लातूर महानगपालिका सभागृह येथे तीन दिवसीय व्यवसाय विकास प्रशिक्षण उपक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

            उद्घाटन प्रसंगी लातूर महानगपालिका आयुक्त अमन मित्तल, कौशल्य विकास विभाग सहाय्यक आयुक्त बालाजी मरे, उद्यमिता राज्य समन्वयक मनोज भोसले, संतोष मगर (एस आर युवा फाउंडेशन ), मनसुर पटेल ( जिल्हा समन्वयक, माविम), वेदांत पाटील (एम जी एन एफ फेलो) व अमोल क्षीरसागर (जिल्हा कौशल्य विकास समन्वयक) प्रमुख पाहूणे उपस्थितीत होते.

मनोज भोसले यांनी पाहुण्यांना उद्यमिता यात्रा माहिती दिली व तीन दिवसीय व्यवसाय विकास प्रशिक्षण उपक्रमाची प्रशिक्षणार्थीना ओळख करून दिली. त्यानंतर पाहुण्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. बालाजी मरे यांनी येवले चहाचे उदाहरण देत प्रशिक्षणार्थींना ब्रॅण्डिंग आणि मार्केटींगचे महत्व सांगीतले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महापालिका आयुक्त अमन मित्तल यांनी नोकऱ्यांचे बदलते स्वरूप आणि बाजाराच्या गरजा या विषयी मार्गदर्शन केले. सोबतच येणाऱ्या काळात उद्योगच टिकू शकतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांनी उद्योजक व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमासाठी 70 प्रशिक्षणार्थी आणि आय टी आय लातुर येथील 50 विद्यार्थी उपस्थितीत होते.

           महात्मा बसवेश्वर महाविद्यालय सभागृह, बस स्टँड समोर, चंद्र, नगर, लातूर येथे पुढील तीन दिवस व्यवसाय विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. युथ एड फाउंडेशनचे तज्ञ प्रशिक्षक मयूर गडसींग प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणात व्यवसायाची निवड कशी करायची, बाजाराचा अभ्यास कसा करायचा, आर्थिक नियोजन कसे करायचे, व्यवसायाचे ब्रॅण्डिंग आणि मार्केटींग कसे करायचे आणि शेवटच्या दिवशी प्रशिक्षणार्थींकडून व्यवसाय फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. त्यासोबतच नवं उद्योजकांना पुढील सहा महिने युथ एड फाउंडेशन मदत आणि मार्गदर्शन करणार आहे.

            उद्यमिता यात्रा जिल्हा समन्वयक श्रीमती. राजश्री कांबळे व सहायक आयुक्त,                                                                                जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता                                                                                                        मार्गदर्शन केंद्र,  लातूर यांनी लातूर जिल्ह्यातील तरुण, तरुणी आणि महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

                                                              0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु