सेवारत सैनिक हवालदार तेलंगे सुर्यकांत शेषेराव यांचा दुर्देवी घटनेत मृत्यू; 29 जून रोजी पहाटे 2.30 वाजता पार्थिव पुणे येथे पोहचणार
सेवारत सैनिक हवालदार तेलंगे सुर्यकांत
शेषेराव यांचा दुर्देवी घटनेत मृत्यू;
29 जून रोजी पहाटे 2.30 वाजता
पार्थिव पुणे येथे पोहचणार
लातूर,
दि.28 (जिमाका):- भारतीय सैन्यातील ब्रिगेड ऑफ
दि गार्डस रेजिमेंट मधील 15 गार्डस बटालियनचे सेवारत सैनिक नंबर 15621167F हवालदार
तेलंगे सुर्यकांत शेषेराव गाव थेरगाव ता. शिरुर अनंतपाळ जि. लातूर हे कर्तव्य बजावताना
दिनांक 27 जून,2022 रोजी दुर्देवी घटनेमध्ये जखमी (Gun Shot Injury) होऊन 167 मिल्ट्री हॉस्पीटल पठाणकोट येथे दिनांक
27 जून, 2022 रोजी दुपारी 3.55 वाजता मृत घोषित केले आहे. त्यांचे पार्थिक अमृसर येथून
दिनांक 28 जून, 2022 रोजी (23.55 वाजता) हवाई विमानाने निघून पुणे येथे दिनांक 29 जून,
2022 रोजी पहाटे 2.30 वाजता पोहचणार असून तिथून रस्ता मार्गे थेरगाव ता. शिरूर अनंतपाळ
कडे येणार आहे , अशी माहिती प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे.
000
Comments
Post a Comment