ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर

 

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक

मतदार यादी कार्यक्रम जाहीर

         

        *लातूर,दि.13 (जिमाका):-* मतदार यादी कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यातील माहे जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम पूढील प्रमाणे घेण्यात येत आहे.

        मतदार यादी ग्राहय धरण्याचा दिनांक- मंगळवार दि. 31 मे 2022, प्राभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक - मंगळवार दि. 14 जून 2022 हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी मंगळवार दि. 14 जून 2022 ते शुक्रवार दि. 17 जून 2022 प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे बुधवार दि. 22 जून 2022 असा आहे असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                            0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु