डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

 

डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

       *लातूर,दि.23(जिमाका)-* महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 26 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयानुसार सन 2016-17 पासून डी.एल.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आलेले आहेत.शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया दिनांक 23 जून 2022 पासून सुरु करण्यात आली आहे.

           डी.एल.एड.प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेबाबतची सन 2022-23 ची प्रवेश नियमावली अध्यापक विद्यालयाची यादी,प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रवेशाबाबतची सूचना www.maa.ac.in या संकेतस्थळावरील (Important Information) मध्ये उपलब्ध आहे. दि. 23 जून 2022 ते 7 जूलै 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सर्व प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

             त्याची ऑनलाईन पडताळणी होऊन विद्यार्थ्यांचा अर्ज प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येईल या संदर्भातील विद्यार्थ्याला वेळोवेळी एसएमएस ई-मेल SMS/E-mail द्वारे कळविले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांने  अर्ज भरताना स्वतःचाच (Email ID) व मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.इतर कोणाचाही (Email ID) व मोबाईल नंबर देण्यात येवू नये.

         व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थाने ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज पूर्ण भरून सबमीट (Submit) करणे बंधनकारक आहे. डी.एल.एड. प्रवेशासाठी अर्ज भरण्यास इ. बारावी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतून किमान 49.5 टक्के गुण खुल्या संवर्गासाठी, 44.5 टक्के मागासवर्गीय संवर्गासाठी गुणांची अट राहील. खुल्या संवर्गासाठी प्रवेश आवेदन पत्र शुल्क रुपये 200/- व मागासवर्गीयासाठी शुल्क रुपये 100/- राहील.

       तरी पात्र व गरजू विद्यार्थ्यांना 7 जूलै 2022 पूर्वी आपले आवेदन पत्र ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावेत असे आवाहन प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,मुरुडचे राजेंद्र गिरी, जि.लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु