माता मृत्यू टाळण्यासाठी गरोदर मातांची गुणवत्तापूर्ण काळजी आवश्यक- मुख्य कार्यकारी अधिकारी- अभिनव गोयल

 

माता मृत्यू टाळण्यासाठी गरोदर मातांची

गुणवत्तापूर्ण काळजी आवश्यक-

                                                               मुख्य कार्यकारी अधिकारी- अभिनव गोयल

         लातूर,दि.9 (जिमाका):-

जिल्ह्यात विविध पातळीवर, गरोदर, मातांच्या सेवा दिल्या जातात. त्यात ग्रामीण भागातील आरोग्य वर्धिनी केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय यांचा समावेश आहे. यामध्ये सेवा सुविधा उपलब्ध असूनही अद्यापही काही माता मृत्यू होत असल्याचे दिसून येते. त्यात प्रसुतीच्या वेळी रक्तस्त्राव होणे, गरोदरपणात व प्रसुती दरम्यान रक्तदाब वाढणे, गर्भाशयाचा जंतूसंसर्ग होणे, रक्तक्षय इ. प्रमुख कारणे आहेत. यावर मात करण्यासाठी गरोदरपणातील आरोग्य सुविधा गुणवत्तापूर्ण आहेत की नाही याची पाहणी करतेवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी या सुचना दिल्या.

            दिनांक 9 जून हा सर्वत्र प्रधानमंत्री सुरक्षीत मातृत्व  दिवस साजरा केला गेला. यात जिल्ह्यातील सर्व प्रा.आ.केंद्र कार्यक्षेत्रातील गरोदर मातांची वैद्यकीय अधिका-यांमार्फत तपासणी करण्यात आली. यात गरोदर मातांच्या रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण (मधुमेह), थॉयरॉईड, व्हीडीआरएल, हिमोग्लोबीन, युरीन अलब्युमीन इ. तपासण्या करण्यात आल्या. यावेळी गरोदर मातांना वैयक्तीक स्वच्छता, आहार, धोक्याची लक्षणे इ. बाबत समुपदेशन करण्यात आले.

                यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्र भातांगळी, बोरी, उपकेंद्र सोनवती येथे प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी सोबत डॉ. वडगावे एच.व्ही., जिल्हा आरोग्य अधिकारी हेही उपस्थित होते. यापुढेही दरमहा 9 तारखेस प्रत्येक पातळीवर प्रधानमंत्री सुरक्षीत मातृत्व अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिनवय गोयल म्हणाले.





                                                       

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा