केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गुणवंताचा जिल्हा प्रशासनाकडून होणार गौरव शुभम भोसले, रामेश्वर सब्बनवाड हे युवक आहेत गौरवार्थी, 15 जून रोजी होणार कार्यक्रम

 

केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गुणवंताचा जिल्हा प्रशासनाकडून होणार गौरव

शुभम भोसले, रामेश्वर सब्बनवाड हे युवक आहेत गौरवार्थी,

15 जून रोजी होणार कार्यक्रम

 

 

लातूर,दि.13(जिमाका):- गेल्या वर्षीही जिल्ह्यातून यु.पी.एस.सीमध्ये यशस्वी झालेल्या युवक / युवतींचा गौरव केला होता. त्यावेळी कोविडचा विळखा असल्यामुळे साधा समारंभ केला होता.

 लातूर पॅटर्न आता पूर्ण राज्यस्तरावर पोहचला असन लातूरची गुणवत्ता सर्व क्षेत्रात हळुहळू वाढत आहे. स्पर्धा परिक्षेतील टक्काही वाढत असून केंद्रिय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत यावर्षी जिल्ह्यातील दोन युवकांनी लक्षणीय यश संपादन केले आहे. त्यात शुभम भोसले ( रँक -149) आणि रोमश्वर सब्बनवाड (रँक -202) या दोघांनी जिल्ह्याला गौरव वाटावा असे यश संपादन केल आहे. या दोघांचा त्यांच्या पालकासह जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या बुधवारी, दिनांक 15 जून, 2022 रोजी गौरव करण्यात येणार आहे. यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे.

         या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. असणार आहेत. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे प्रमुख उपस्थिती असणार आहे.  

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु