उदगीर तालुक्यातील मल्लापुर येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवणूक मतमोजणीचा दिवस- मतमोजणी संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत मद्य विक्री बंद
उदगीर
तालुक्यातील मल्लापुर येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवणूक
मतमोजणीचा दिवस- मतमोजणी
संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत
मद्य विक्री बंद
*लातूर,दि.3(जिमाका):-* लातूर जिल्ह्यातील मल्लापुर ता.उदगीर जि.लातूर अशा एकूण 1 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक
निवडणुकांसाठी निवडणूक दि. 5 जून 2022 रोजी होणार आहे. या ग्रामपंचायत हद्यीमध्ये अबकारी
अनुज्ञप्ती कार्यरत नसून सदर ग्रामपंचायतीची मतमोजणी ही तहसील कार्यालय, उदगीर येथे
दिनांक 6 जून 2022 रोजी पार पाडण्यात येणार आहे.
मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महारार्ष्ट राज्य यांच्या
नमूद निर्देशान्वये तसेच महारार्ष्ट मद्यनिषेध कायदा 1949 व त्या अंतर्गत् विविध नियमातील
तरतुदींनुसार मला प्राप्त असलेल्या शक्तीचा वापरकरुन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.लातूर
यांनी दि. 6 जून 2022 रोजी मतमोजणी संपूण निकाल जाहिर होईपर्यंत उदगीर शहरातील (नगर
परिषद हद्यीतील ) सर्व अबकारी अनुज्ञप्त्यांचे मद्य विक्रीचे व्यवहार पूढील प्रमाणे
पूर्णत: बंद ठेवण्याबाबत आदेशित केले आहे.
अनुज्ञप्ती बंद ठेवावयाची तारीख दि.
6 जून 2022 व बंद ठेवावयाचा कालावधी मतमोजणीचा दिवस- मतमोजणी संपूर्ण निकाल जाहीर होईपर्यंत.
या आदेशाची उदगीर शहरातील (नगर परिषद
हद्यीतील ) सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक सदर आदेशाची
अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम
54 (सी) नुसार तसेच अनुषंगिक नियमांनुसार कडक कारवाई करण्यात येईल असे ही आदेशात नमूद
केले आहे.
000
Comments
Post a Comment