प्रधानमंत्री कुसूम पारेषण विरहीत सौर कृषीयोजना (घटक ब) फसव्या संकतस्थळापासून व भ्रमणध्वनीपासून सावधान

 

प्रधानमंत्री कुसूम पारेषण विरहीत सौर कृषीयोजना (घटक ब)

फसव्या संकतस्थळापासून व भ्रमणध्वनीपासून सावधान

 

*लातूर,दि.16(जिमाका):-*प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकरी, लाभार्थ्यांनी फसवे संकेत स्थळ, भ्रमणध्वनीपासून, सावध रहावे असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक, लातूर यांनी केले आहे.

          काही बनावट संकेत स्थळ, मोबाईल ॲप तसेच दुरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी अर्ज करण्यास व नोंदणी शुल्क आणि सौर पंपाची किंमत ऑनलाइन भरणा करण्यास सांगितले जात आहे, अशा खोटया, फसव्या संकेत स्थळांसह मोबाईल ॲपला भेट देऊ नये तसेच फसव्या दुरध्वनी, भ्रमणध्वनीच्या संभाषणाला, आवाहनाला बळी पडू नये व अशा फसव्या संकेत स्थळावर, ॲपवर कोणत्याही पध्दतीने पैशाचा भरणा करु नये, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक, लातूर यांनी केले आहे.

          ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ राज्य सरकारच्या महाऊर्जा या विभागामार्फत राबवण्यात येत आहे. महाऊर्जाच्या या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाइन नोंदणीसाठी  http://kusum.Mahaurja.com /solar/ beneficiary/ register/Kusum-Yojana-Componenet-Bwww.mahaurja.com या संकेतस्थळाला भेट द्यावी व अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय, लातूर दुरध्वनी क्रं. 02382-226680 व जिल्हा कार्यालय, बीड दुरध्वनी क्रं. 02442- 226680 येथे किंवा ई-मेल domedalatur@mahaurja.com वर संपर्क साधावा, असे अवाहन प्रकल्प अधिकारी, महाऊर्जा विभागीय, लातूर कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.

 

                                                     0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु