शासकीय सेवेत समर्पणाने काम करणारे लोक, सेवा निवृत्तीनंतरही ताणतणावापासून मुक्त राहतात --- यशवंत भंडारे

 

शासकीय सेवेत समर्पणाने काम करणारे लोक,

सेवा निवृत्तीनंतरही ताणतणावापासून मुक्त राहतात

      --- यशवंत भंडारे

 

लातूर,दि.2,(जिमाका):-   शासकीय नोकरीच्या  कारकीर्दीमध्ये जी माणसं समर्पणाने काम करतात, ते त्यांच्या सेवा निवृत्तीनंतरही मानसिक ताणतणावापासून मुक्त राहतात. स्वत:ला कुठल्याही कामात गुंतवून घेतात असे प्रतिपादन विभागीय माहिती उपसंचालक यशवंत भंडारे यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयातील कॅमेरामन आश्रुबा सोनवणे हे आपल्या 30 वर्षाच्या दिर्घ कारकिर्दीनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, विभागीय माहिती कार्यालयाच्या माहिती सहाय्यक श्रीमती रेखा पालवे, लेखापाल अशोक माळगे तसेच जिल्हा व विभागीय कार्यालयातील कर्मचारी विवेक डावरे, श्रीमती मनिषा कुरुलकर, श्रीमती विशाखा शेंडगे, अहेमद बेग, दिलीप वाठोरे, सिध्देश्वर कोंपले, रामकिशन तोकले, प्रवीण बीदरकर, अशोक बोर्डे, शेख कलीम, व्यंकट बनसोडे, तसेच दैनिक सामानाचे जिल्हा प्रतिनिधी अभय मिरजकर, दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी दिपरत्न निलंगेकर आदींची यावेळी उपस्थिती होती.



 

 

****

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु