26 जून, 2022 रोजी सारथी कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचे आयोजन

 

26 जून, 2022 रोजी सारथी

कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचे आयोजन

 

            *लातूर,दि.23(जिमाका)-* राजर्षी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी कार्यरत आहे. त्यांच्यासाठी रविवार दि. 26 जून 2022 रोजी कौशल्य विकास जनजागृती मेळावा आयोजन करण्यात आले आहे.

         राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर यांचे संयुक्त विद्यमाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचे आयोजन दि.26 जून 2022 रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (DPDC Hall), मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, शिवाजी चौक, लातूर येथे आयोजन करण्यात आले आहे.

सदर जनजागृती मेळाव्यात मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील युवक-युवतींची कौशल्यविषयक अभ्यासक्रमांसाठी नाव नोंदणी, समुपदेशन आणि प्रशिक्षणानंतर रोजगार व स्वयंरोजगाराकरीता उपलब्ध असलेल्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचा उक्त लक्षित गटातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., यांनी केले आहे.      

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु