*उत्तम शिक्षण नव्हे, तर तुमचा अनुभव तुम्हाला संपन्न करतो*

*- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.*

 


*लातूर, दि.26:- (जिमाका):-* उत्तम शिक्षण घेऊन अनुभव नसेल तर फारसा उपयोग नसतो त्यामुळे उत्तम शिक्षणाबरोबर तुम्हाला मिळणारा अनुभव हा संपन्न करतो. त्यामुळे युवा पिढीने कोणत्याही व्यवसाय करीत असतांना वेतनाचा विचार न करता अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. मनामध्ये एक आत्मविश्वास असायला हवा. त्यासोबतच मनातील एखादी कल्पना असायला हवी. व्यावसायिक क्षेत्रामधील मेहनत वाया जात नाही. शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाचे बॅलन्स असणे आवश्यक आहे. यातून आपल्या स्वत:चे कौशल्य विकास करु शकतो. यातून येणारी पिढीही आत्मनिर्भर भारत होण्यास मदत होणार आहे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रतिपादन केले. 


कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या लक्षित गटातील युवक-युवतीकरिता कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचे आयोजन येथे जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृह (डीपीडिसी)  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त बालाजी मरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री हनबर, अभय पालवणकर, विलासराव देशमुख महाविद्यालय विज्ञान संस्थेचे संजय मगर आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन करण्यात आली.


कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त बालाजी मरे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. कौशल्य विकास विभागामार्फत 2015 विकास विभाग निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास विभाग करण्यामागची भूमिका अशी होती की, युवा आणि युवक यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. छोट्या - छोट्या पद्धतीचे आपण स्कीलचे व्यावसायिक प्रशिक्षण व त्यांना रोजगाराच्या संधी विविध प्रकारच्या निर्माण करण्यासाठी देणे प्रमुख भूमिका आहे. 


या माध्यमातून आतापर्यंत आपण बऱ्याच उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासनाने  जिल्हा प्रशासनाच्या काही योजना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येते. यात राज्य शासनाने प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आहे. यामार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येते. शासन योजना राबवत असताना फक्त प्रशिक्षण झाल्यानंतर आपल्याला रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विविध प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत, की ज्या पद्धतीने युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत या प्रकारच्या जिल्हा प्रशासनाची सातत्याने प्रयत्न करीत असते.


मराठा , कुणबी मराठा या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विभागामार्फत काही अभ्यासक्रम सुरु आहेत. युवा पिढीने आपल्या मित्र - मैत्रिणी असतील, त्यांच्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत - जास्त नाव नोंदणी करुन घ्यावी यासाठी प्रशासनाकडून सतत प्रयत्न सुरू राहणार आहे. या माध्यमातून आपल्याला त्यांची स्थानिक रोजगाराची निर्मिती करणे. युवा पिढींना व्यावसायिक शिक्षणाकडे वळविणे हा प्रमुख उद्देश आहे. 

जिल्हा समन्वयक प्रशांत पाटील यांनी अण्णासाहेब  पाटील महामडंळ योजनेतंर्गत दोन योजना राबवित आहोत.  अण्णासाहेब पाटील ही योजना फेब्रुवारी 2018 पासून महाराष्ट्रात अंमलात आलेली आहे. महाराष्ट्रातील जे आर्थिक दृष्ट्या मागास मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी व्याज परतावा योजना राबवली जाते. यामध्ये पहिली आहे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना याच्यासाठी नियम आणि अटी आहेत. याबाबतच्या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची माहिती सर्वांना दिली.  


विलासराव देशमुख महाविद्यालय विज्ञान संस्थाचे संजय मगर यांनी सादरीकरणाद्वारे साथीच्या माध्यमातून उद्योग व्यवसायाचे महत्त्व.शासनाकडून योजना ठराविक असतात. संकोच बाळगू नये. सॉफ्ट स्किल, हार्ड स्किल महत्त्व आहे. जगातील कोणत्याही क्षेत्रात गेलो तर, याच अनन्य साधारण महत्व आहे. 

नेमकी संधी आहेत, ती माहिती परीक्षण करणं अवश्यक आहे. आपल्या प्रॉब्लेम सोलविंगवर भर द्यावा, निर्णय क्षमता असणे आवश्यक आहे. 


जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चंद्रकांत हनबर म्हणाले की, युवा पिढीने नौकरीपेक्षा व्यावसायिक शिक्षण स्वीकारावे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करावा. व्यवसाय करण्याची जिद्द असली पाहिजे. त्याची माहिती घेऊनच व्यवसायात उतरावं. खरोखर प्रयत्न केला तरच व्यवसायात उतरावं. व्यवसाय शिवाय पर्याय नाही. नौकरी पेक्षा व्यवसायामध्ये प्रगती जास्त आहे, असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून कर्जे घेवून नियमित फेड करणाऱ्या लाभार्थी नागझरी परमेश्वर पवार, रवी कदम, अमर बिराजदार यांनी आप अपली मनोगते व्यक्त केली.

प्रास्ताविक असलम शेख, सूत्रसंचालन अमोल क्षीरसागर यांनी तर नारायण साळुंखे यांनी केले.

*राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर; 46 व्यक्तींनी केलं रक्तदान*

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा-कुणबी, कुणबी - मराठा, मराठा - कुणबी या लक्षित गटातील युवक-युवतीकरिता कौशल्य विकास जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने आरोग्य विभागामार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते यामध्ये सहभागी होवून सामाजिक बांधिलकी जपून  46 व्यक्तींनी रक्तदान केले.   

****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा