ऑफिसर्स क्लबच्या माध्यमातून राष्ट्रीय खेळाडू घडावेत -जी. श्रीकांत यांचे प्रतिपादन

 

ऑफिसर्स क्लबच्या माध्यमातून राष्ट्रीय खेळाडू घडावेत

                                                  -जी. श्रीकांत यांचे प्रतिपादन

। लातूर ऑफिसर्स क्लबची सर्वसाधारणसभा उत्साहात संपन्न ।

        *लातूर,दि.2(जिमाका):-*

ऑफिसर्स क्लबच्या माध्यमातून लातूरकरांसाठी एकाच छताखाली सर्व खेळांच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. या माध्यमातून भविष्यात राष्ट्रीय खेळाडू घडावेत, अशी अपेक्षा क्लबचे संस्थापक अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली. रविवारी लातूर ऑफिसर्स क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. क्लबचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी., उपाध्यक्ष निखिल पिंगळे, अभिनव गोयल, अमन मित्तल, कोषाध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

           जिल्हाधिकारी तथा क्लबचे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी क्लबमध्ये कोणत्या सुविधा सुरू झाल्या आहेत आणि कोणत्या आगामी काळात सुरू होणार आहेत याची माहिती सांगितली. देशभरातील महत्वांच्या शहरातील क्लबसोबत सामंजस्य करार करण्याचा मानस आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून ज्यांची आर्थिक क्षमता नाही अशा होतकरू खेळाडूंना क्लब मधील सुविधा मोफत वापरता येतील, अशी तरतूद करण्यात आली आहे.

           इतर शहरातील क्लबमध्ये असलेल्या सुविधा आणि तेथील शुल्क पाहिले, तर लातूर ऑफिसर्स क्लबमधील सुविधा अधिक असूनही येथील शुल्क कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लातूरकरांनी आपल्या आणि पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्लबचे सदस्यत्व घ्यावे, असे आवाहन पृथ्वीराज बी.पी. यांनी केले. क्लबच्या सुंदर ईमारतीमुळे लातूरच्या वैभवात भर पडली आहे, असे मत उपाध्यक्ष निखिल पिंगळे यांनी व्यक्त केले. अभिनव गोयल, अमन मित्तल यांनी क्लबमधील सोयी सुविधा पाहता लातूरकरांनी क्लबचे सदस्यत्व घेण्याचे आवाहन केले. प्रारंभी क्लबचे सचिव तथा उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी मागील वर्षातील कामकाजाचा आढावा सदस्यांसमोर ठेवला. तर कोषाध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी मागील अर्थिक वर्षाचा लेखाजोखा मांडला. यावेळी क्लबसाठी गोल्डन मेंबरशीप घेतलेल्या सदस्यांचे कौतुक करण्यात आले. तर क्लबची ईमारत उभी करणारे कंत्राटदार, व्यवस्थापक, कर्मचारी, प्रशिक्षक यांचा सत्कार करणार आला.  

लातूर क्लबमधील सुविधा

           आजघडीला लातूर ऑफिसर्स क्लबमध्ये जीम, स्विमींग पुल, बॅडमिंटन कोर्ट, बिलीयर्डस्, कॅरम, बुद्धीबळ, वॉकींग ट्रॅक, वाचनालय, पार्टी लॉन या सुविधा कार्यान्वित झाल्या आहेत. येत्या काळात प्रशस्त रूम, रेस्टॉरंट अशा सुविधाही लवकरच कार्यान्वित होणार आहेत, असे सचिव जीवन देसाई यांनी सांगितले.  


                                             



Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा