महाकृषी ऊर्जा अभियानातून - कृषीला जोड सौर ऊर्जेची महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची ‘पीएम-कुसुम’ योजना
*महाकृषी ऊर्जा
अभियानातून - कृषीला जोड सौर ऊर्जेची*
*महाकृषी ऊर्जा
अभियान अंतर्गत राज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची
‘पीएम-कुसुम’ योजना
*लातूर,दि.28(जिमाका):-*राज्य शासनाने अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास
घडवून आणण्यासाठी, शेतकऱ्यांच्या कृषीपंप वीज जोडण्यांचे विद्युतीकरण सौर ऊर्जेव्दारे
करण्यासाठी राज्य शासन गेल्या काही वर्षापासून स्वयंअर्थसहाय्यीत तसेच केंद्र शासनाच्या
अर्थसहाययातून विविध योजना राबवत आहे. त्याअंतर्गत केंद्र शासनाकडून देशभरात राबविण्यात
येत असलेल्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियानाला (पीएम-कुसूम)
राज्यात गती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासानाने घेतला आहे.
राज्यातील
कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याचे महाकृषी ऊर्जा अभियान
जाहीर केले आहे. राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा निर्मिती धोरण
2020 अंतर्गत प्रतिवर्षी 1 लाख या प्रमाणे पुढील 5 वर्षात 5 लाख पारेषण विरहीत सौर
कृषी पंप आस्थापित करण्यास मान्यता दिली आहे. ही योजना राज्यातील 34 ग्रामीण जिल्हयात
राबण्यात येणार आहे. राज्यात हे अभियान स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट्र ऊर्जा विकास
अभिकरण- महाऊर्जा) मार्फत राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना
दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपारिक पध्दतीने कृषीपंप जोडण्यासाठी
लागणाऱ्या खर्चात व राज्य शासनाव्दारे सबसिडी पोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीचे
उद्दिष्ट साध्य व्हावे . याकरिता राज्यातील शेतकऱ्यांना पारंपारिक पध्दतीने वीज जोडणी
उपलब्ध नाही अशा ठिकाणी पारेषण विरहीत सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येतील. या
योजनेसाठी केंद्र शासनाचे 30 टक्के अर्थसहाय्य उपलब्ध आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील
लाभार्थ्याचा हिस्सा 10 टक्के आणि अनुसुचित जाती व अनुसचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याचा
हिस्सा 5 टक्के असणार असून उर्वरित टक्के
60 /65 टक्के हिस्सा राज्य शासनाचा असेल.
पीएम-कुसूम
योजना राबविण्यासाठी महाऊर्जा मार्फत स्वतंत्र ऑनलाईन पोर्टलवर विहित नमुन्यातील अर्जासोबत
आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज करावा. सौर कृषीपंपासाठी पुरवठादाराकडून 5 वर्षासाठीचा
सर्वकष देखभाल व दुरूस्ती करार केला आहे. व तक्रार नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध
आहे. सौर कृषीपंप आस्थापित झाल्यानंतर तो संबंधीत लाभार्थ्यास हस्तांतरीत करण्यात येईल.
त्यानंतर त्याची दैनंदिनी सुरक्षीतता करण्याची जबाबदारी संबंधीत लाभार्थ्याची राहिल. पीएम-कुसूम योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी
https://Kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर भेट द्यावी.
पीएम-कुसूम
योजने अंतर्गत सद्य:स्थितीत 52750 लाभार्थी निश्चित झाले असून यापैकी पात्र 35578 लाभार्थ्याना
लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी SMS पाठविण्यात आले यापैकी 27026 लाभार्थ्यांनी लाभार्थी
हिस्सा जमा केला आहे. एकूण 18357 ठिकाणी सर्व्हेक्षणाचे काम पुर्ण झाले असून सुमारे
4000 सौर कृषीपंप आस्थापित झाले आहेत.
पीएम-कुसूम
योजने अंतर्गत अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर,
नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड परभणी, पुणे, सोलापूर, वाशिम व यवतमाळ जिल्हयातील
उपरोक्त उद्दिष्टे पुर्ण झाले आहे. तसेच अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली,
गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी,सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,
ठाणे, व वर्धा या जिल्हयांमध्ये सौर कृषीपंप उपलब्ध असून लाभार्थ्यांना नोंदणी करण्याकरिता
पोर्टल सुरू आहे.
राज्यामध्ये
अशा प्रकारच्या अवैध / फसव्या संकेतस्थळ व सोशल मिडियाव्दारे शेतकऱ्यांना फसवणुकीचे
प्रकार होत असून फसव्या संकेतस्थळावर जाऊ नये तसेच कोणतेही शुल्क भरू नये अशा प्रकराच्या
फसव्या वेबसाईट तसेच Social Media वरून शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्यांविरूध्द योग्य
ती कारवाई करण्यात येत आहे. तरी लाभार्थी शेतकऱ्यांनी पीएम-कुसूम योजनेमध्ये सहभाग
घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेत स्थळाचा वापर करावा व लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी इतर
कुठल्याही अनोळखी संकेतस्थळ/SMS संदेश व इतर माध्यमातून येणारी लिंक /SMS वापरू नये.
अधिक माहितीसाठी
उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे पुढील शासन निर्णय पहावेत (शासन निर्णय राज्य शासनाच्या
http:s//maharashrta.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहेत.) कृषीपंप वीज जोडणी धोरण
2020 बाबतचा दि. 18 डिसेंबर, 2020 रोजीचा शासन निर्णय. राज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर उर्जेव्दारे
विद्युतीकरण करण्याचे अभियान बाबतचा दि. 12 मे 2021 रोजीचा शासन निर्णय.
00000
Comments
Post a Comment