पावसाळयातील रोगराई-आणि घ्यायची काळजी..

 

पावसाळयातील रोगराई-आणि घ्यायची काळजी..

पाणी हेच जीवन असे संबोधल्‍या जाते. मानवी जीवनात स्‍वच्‍छ व शुध्‍द पाण्‍याचे महत्‍व अनन्‍य साधारण आहे. असुरक्षित पिण्‍याचे पाणी व अस्‍वच्‍छ परिसर यामुळे समाजात आरोग्‍याच्‍या प्रमुख समस्‍या उद्भवतात. पाण्‍याची गुणवत्‍ता हा सुरक्षित पाणी पुरवठयासाठी सर्वात महत्‍वाचा घटक आहे. गावातील परिसर व वैयक्तिक स्‍वच्‍छतेची स्थिती ही पाण्‍याच्‍या गुणवत्‍तेसाठी प्रामुख्‍याने जबाबदार असते. काही वेळा स्‍त्रोतामधून मिळणारे पाणी योग्‍य गुणवत्‍तेचे नसते, प्रथमत: स्‍त्रोताच्‍या पाण्‍याची गुणवत्‍ता समजून घेणे आणि त्‍यानंतर स्‍त्रोतापासून ते प्रत्‍यक्ष घटकापर्यंत पाण्‍याचा प्रवास समजून घऊन ज्‍या- ज्‍या ठिकाणी पाणी दुषीत होण्‍याची शक्‍यता असते तेथे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करणे आवश्‍यक असते. (जसे- लिकेज, व्‍हाल्‍व्‍ह गळती, नळ कोडांळे नसने, नळाचे खड्डे) पिण्‍याचे पाणी जीवाणु व रासायनिक प्रदुषणापासून मुक्‍त हवे.जीवाणु प्रदुषणामुळे अतिसार, आमांश, विषमज्‍वर, काविळ यासारखे आजार होतात. तर अमर्याद पाण्‍याचा उपसा, रासायनिक खतांचा वापर व औषधांची फवारणी, स्‍त्रोताभोवती उकिरडे इत्‍यादीमुळे नायट्रेटचे प्रमाण वाढून लहान बालकांत ब्‍लुबेबी सिंड्रोम (मिथॅहिमोग्‍लोबिनीया) यासारखा आजार होतो. यामध्‍ये लहान बालकांचे ऑक्‍सीजन वहन क्षमता कमी होते. तर पाण्‍यात फ्लोराईड प्रमाण वाढल्‍यास दंतविकार उद्भवतात यात दात वेडे वाकडे होणे, दात ठिसूळ होणे हाडांनमध्‍ये बाक येतो. पाण्‍यात  क्‍लोराईड व कॅलशियमचे प्रमाण वाढल्‍यास मुतखडा, किडनीचे आजार, कॅन्‍सर इत्‍यादी आजार होतात.

स्‍वच्‍छता असेल तेथे आरोग्‍य नांदेल. आरोग्‍य नांदेल तर भरभराट होईल असे म्‍हणतात आपल्‍याला मिळणारे सर्व पाणी पावसापासूनच मिळते ते आपल्‍यापर्यंत दोन प्रकाराच्‍या अवस्‍थांव्‍दारे पोहचते.

1) भूपृष्टावरील पाण्‍याचे स्‍त्रोत. (उदा.नदी, तलाव, धरणे इ.)

2) जमीनीखालील पाण्‍याचे स्‍त्रोत. (उदा.हातपंप, विद्युतपंप, विहीर इ.)

पाण्‍याचे प्रदुषण कशाने होते?

निसर्गातून मिळणारे पावसाचे पाणी शुध्‍द स्‍वरूपात असते, हे पाणी आकाशातून जमीनीवर येताना त्‍यात हवेतील वायु व धुलीकण मिसळतात तसेच जमीनीवरून प्रवास करताना त्‍यामध्‍ये विविध घटक, भुगर्भातील विविध क्षार  मिसळतात. नैसर्गीकरित्‍या पाणी काही प्रमाणात प्रदुषित होत असले तरी, मानवनिर्मीत कारणांने पाण्‍याचे मोठया प्रमाणात प्रदुषण होते. पाणी विविध प्रकारामुळे दुषित होते.

रासायनिक प्रदुषण -

यामध्‍ये पाण्‍यात फ्लोराईड, क्‍लोराईड, कॅलशियम, अर्सेनिक, लोह, नायट्रेट, खते, इत्‍यादींचा अंश पाण्‍यात मिसळलेला असतो.

जैविक प्रदुषण u

पाण्‍यामध्‍ये जीवजंतू, जीवाणु, विषाणु, परोपजीवी पेशी (अमिबा), कृमी इत्‍यादीचे अस्‍तीत्‍व असणे.

शिवाय कारखाण्‍यातील सांडपाण्याव्‍दारे किरणोत्‍सारी पदार्थ पाण्‍यामध्‍ये मिसळूण  पाणी प्रदुषित होते.

मानवनिर्मीत कारणे-

मानवनिर्मीत कारणामुळेही पाणी मोठया प्रमाणावर प्रदुषित होत असते. नदी, नाले, ओढे, झरे, तळे, बांधाचे पाणी दुषित होण्‍याच्‍या कारणांमध्‍ये-

·        पात्रात किंवा काठावर शौच्‍यास बसने. अंघोळ करणे, पोहणे, कपडे धुणे, गुरे जनावरे, वाहने धुणे.

·        कारखान्‍यातील टाकावू पदार्थ, रासायनिक द्रव्‍ये पाण्‍यात सोडणे.

·        सांडपाणी, मलमुत्र, गटाराचे पाणी, पात्रात सोडणे.

·        मानव, पशुपक्षी यांचे मृतदेह पाण्‍यात सोडणे.

·        धार्मिक विधी, मुर्तीविसर्जन, पूजेचे साहित्‍य (निर्माल्‍य) टाकणे, नदी काठावर जनावरांचे गोठे बांधणे.

·        हातपंपाभोवती उकिरडे असने, शौचालयाचे सांडपाणी सोडणे,  सिमेंटचा ओटा नसणे.

·        पाईप लाईन गळती असने,

·        उघडया विहीरीमध्‍ये पालापाचोळा पडणे.

·        उघडयावर शौच्‍यास बसणे.

अशा प्रकाराणे दुषित झालेले पाणी पिल्‍यामुळे होणा-या आजारात अतिसार, आमांश(डिसेंट्री) विषमज्‍वर, काविळ, लेप्‍टोस्‍पायरोसिस, इत्‍यादी आजारांचा समावेश होतो.

1) अतिसार- शौचाला पातळ होणे किंवा पाण्‍यासारखे पातळ जुलाब होणे याला अतिसार म्‍हणतात. पावसाळयात दुषित पाण्‍यामुळे साथीच्‍या स्‍वरूपात होणा-या आजारा पैकी एक पाण्‍यात विविध प्रकारचे ई-कोलाय सारखे जीवाणु व विषाणुमुळे पाणी दुषित होऊन असे दुषित झालेले पाणी पिल्‍यामुळे अतिसार होतो यात जलशुष्‍कता होऊन उपचार न मिळाल्‍यास मृत्‍युही संभवतो.

2) आमांश (डिसेंट्री) u अमिबा या एक पेशीय जीवामुळे पाणी दुषित होऊन हा आजार होतो. यात पोटात कळ घालून शौचास होते. शौचातून चिकट आव  (शेंम) पडते कधी-कधी रक्‍तही पडते, कधी-कधी फेस पडतो.

3) कॉलरा u व्हिब्रीओ कॉलरा या सुक्ष्‍म जीवाणुमूळे होणारा आजार यात जुलाब हे अत्‍यंत पातळ म्‍हणजे भाताच्‍या पेजेसारखी होतात.तीव्र जलशुष्‍कता होते. त्‍यामुळे जीभ कोरडी पडते, डोळे खोल जातात, पोटावरील त्‍वच्‍या ओढल्‍यास पुर्ववत होण्‍यास वेळ लागतो. वेळीच उपचार न मिळाल्‍यास तीव्र जलशुष्‍कता होऊन मृत्‍यु संभवतो. जलसंजिवनी अथवा  शिरेव्‍दारे सलाईन देऊन जलशुष्‍कता कमी केल्‍या जाते.

4) काविळ (यकृतदाह)  काविळ हा विषाणुजन्‍य आजार असून हा दुषित पाण्‍याव्‍दारे पसरणारा आजार आहे. यात भुक मंदावते, अंगदुखी, पोटात दुखणे, अशक्‍तपणा जाणवतो, शरिराची त्‍वचा व डोळे पिवळे दिसतात. काविळात योग्‍य आहार, विश्रांतीला महत्‍व आहे.

5) विषमज्‍वर- दुषित पाण्‍याव्‍दारे पसरणारा आजार आहे. हा रोग सालमोनेला टायपी या सुक्ष्‍म जीवाणुमुळे होतो. विषमज्‍वरात सतत जास्‍त ताप असने, डोकेदुखी, अंगदुखी, खुप थकवा, पोटदुखी इत्‍यादी लक्षणे असतात. उपचारात हलका पातळ आहार, पुर्ण विश्रांतीला महत्‍व आहे. यावर प्रतिजैविकाचा वापर करावा लागतो.

पावसाळयात साठलेल्‍या पाण्‍यावर जसे- डबकी, नाले, खड्डे इत्‍यादीच्‍या पाण्‍यात डासोत्‍पती होऊन डेंग्‍यु, हिवताप, फायलेरिया, चिकनगोनिया या सारखे किटकजन्‍य आजार होतात.

 

 

डॉ. श्रीकांत कुलकर्णी

जिल्‍हा साथरोग अधिकारी, जि.प., लातूर

 

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा