25 जुन ते 1 जुलै 2022 या कालावधीत जिल्ह्यामध्ये कृषि संजीवनी सप्ताह मोहीमेचे आयोजन

 

25 जुन ते 1 जुलै 2022 या कालावधीत जिल्ह्यामध्ये

कृषि संजीवनी सप्ताह मोहीमेचे आयोजन

 

           *लातूर,दि.22(जिमाका)-* जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की, दिनांक दि. 25 जुन ते 01 जुलै 2022 पर्यंत कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येणार आहे. खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचविण्यासाठी सदर मोहीम राबविण्यात येत आहे.

 या मोहिमेअंतर्गत महत्वाच्या खरीप पिकांचे लागवड तंत्रज्ञान,नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कृषी विभागाच्या योजनांबाबत शेतकऱ्यांना शेतीशाळा, कार्यशाळा, चर्चासत्रे, वेबिनार, प्रशिक्षणाचे आयोजन करून जिल्ह्यातील कृषि विभागाचे अधिकारी / कर्मचारी / कृषि विद्यापीठे / कृषि विज्ञान केंद्रे यांचे शास्त्रज्ञ यांचे मार्फत  शेतक-यांना  मार्गदर्शन करण्यात येणार आहे .

     संपुर्ण जिल्ह्यात कृषि संजीवनी मोहिम पूढील  वेळापत्रका प्रमाणे राबविण्यात येणार  आहे. दि. 25 जुन 2022 -विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार,मुल्यसाखळी बळकटीकरण दिन.   26 जुन 2022 - पौष्टिक तृणधान्य दिवस,27 जुन 2022 - महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरन दिवस, 28 जुन 2022 - खत बचत दिन, 29 जुन 2022 - प्रगतशिल शेतकरी संवाद दिवस, 30 जुन 2022 - शेती पूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस व  01 जुलै  2022 - कृषि दिन असा आहे.

        जिल्ह्यातील सर्व शेतक-यांनी या मोहीमेचा लाभ घ्यावा.तसेच अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी  प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु