माजी सैनिक पाल्यांच्या वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु प्रवेश घेण्याचे आवाहन

 

माजी सैनिक पाल्यांच्या वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरु

प्रवेश घेण्याचे आवाहन

 

             *लातूर,दि.13 (जिमाका):-*  लातूर येथे आधुनिक पध्दतीच्या सर्व सोयी उपलब्ध्‍ असलेले स्वच्छ व सुंदर असे माजी सैनिक मुलांचे वसतिगृह आहे. या वसतीगृहात लातूर येथे शिक्षण घेणाऱ्या सर्व माजी व आजी सैनिक व विधवांच्या पाल्यांना तसेच वसतिगृहात जागा शिल्लक राहिल्यास नागरी मुलांना प्रवेश दिला जाईल.प्रवेश प्रक्रिया दि.14 जून 2022 पासून प्रवेश पुस्तिका वाटप सुरु करण्यात येत आहे. तरी सर्व आजी / माजी सैनिक , युध्द विधवा व माजी विधवाच्या पाल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी केले आहे.

        या वसतिगृहात पूढील प्रमाणे नमुद केलेल्या सुविधा उपलब्ध्‍ आहेत. उत्तम भोजन व्यवस्था, राहण्याची सर्व सोय, अभ्यासिका व वाचनालयाची सोय व खेळांची सोय. शैक्षणिक वर्ष  2022-23 पासून भोजन व निवास भाडे नवीन दर प्रतिमहीना पूढील प्रमाणे ठरविण्यात आले आहे.

      सेवारत सैनिक / माजी सैनिक- अधिकारी 1000 जेसीआहे 900 सिपाई / एनसीओ 700 जेसीओ 800 शिपाई / एनसीओ 600 व नागरी पाल्य 2250 नोट- युध्द विधवा व माजी सैनिक विधवांचे सर्व पाल्याना राहण्याची / भोजन व्यवस्था निशुल्क आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया ही वसतिगृह प्रवेश नियम व अटीमधील नमूद प्राधान्यक्रमाणे प्रवेश निश्चित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी  वसतिगृह अधिक्षक , माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, लातूर येथे संपर्क साधावा, कार्यालयीन टेलीफोन नं. 02382-228544 असा आहे.

 

                                                                0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा