धान्य विक्रेता व्यापाऱ्यांनी 1 जूलै ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीसाठी धान्याचे दर पत्रक सादर करण्याचे आवाहन

 

धान्य विक्रेता व्यापाऱ्यांनी 1 जूलै ते 31 डिसेंबर 2022

या कालावधीसाठी धान्याचे दर पत्रक सादर करण्याचे आवाहन

लातूर,दि.17(जिमाका)-सैनिकी मुलांचे / मुलींचे वसतीगृह, सैनिक संकुल, अंबाजागाई रोड लातूर येथे आहे. सैनिकी मुलां / मुलींचे वसतीगृहासाठी अंदाजे प्रतिदिन 100 विद्यार्थ्यांसाठी दरमहा धान्य खरेदी केले जाते. तरी लातूर शहरातील सर्व धान्य विक्रेता व्यापारी यांना कळविण्यात येते की, 1 जुलै ते 31 डिसेंबर 2022 कालावधीसाठी सर्व धान्याचे कमीत कमी सहा महिन्याचे स्थिर भाव दरपत्रक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लातूर यांचे नावे सैनिकी मुलांचे / मुलींचे वसतीगृह लातूर येथे सादर करावे. सात दिवसाच्या आत आलेल्या दरपत्रकाचा विचार केला जाईल. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                            0000

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु