खरीप 22-23 हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत्‍ अनुदानावर महाबीजचे तुर, उडिद बियाणे उपलब्ध

 

खरीप 22-23 हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत्‍ अनुदानावर

महाबीजचे तुर, उडिद बियाणे उपलब्ध

            *लातूर,दि.13 (जिमाका):-* खरीप 22-23 हंगामामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत्‍ प्रमाणित बियाणे वितरण या घटकामध्ये तुर  BDN-711, BDN-716, PKV TARA , उडिद AKU-10-1 , 10 वर्षाच्या आतील वाण व तुर BSMR  736, ICP-8863 व उडिद TAU-1 हे 10 वर्षावरील वाण अनुदानीत दराने महाबीज विक्रेते व उपविक्रत्याकडे अनुदानील दराने 7/12 , आधार कार्डाची झेरॉक्स प्रत देवुन उपलब्ध्‍ झालेले आहे.

           10 वर्षाच्या आतील तुर BDN-711, BDN-716, PKV TARA -2 किलो बॅगची मुळ किंमत 260 प्रति बॅग अनुदान रु. 100 प्रती बॅग व अनुदानीत दर रु. 160 प्रती बॅग, उडीद AKU-10-1 पाच किलो बॅगची मुळ किंमत 750 रु. अनुदान प्रती बॅग 250 रु. व अनुदानीत प्रती बॅग किंमत 500 रुपये. 10 वर्षावरील तुर BSMR  736, ICP-8863  2 किलो बॅगची  मुळ किंमत 250 रु.अनुदान प्रती बॅ रु. 50 व अनुदानित किंमत 200 रु. प्रती बॅग उडीद TAU-1 पाच किलो बॅगची मुळ किंमत 700 रु. प्रति बॅग, अनुदान रु. 125 प्रती बॅग व अनुदानित किंमत रु. 575 प्रति 5 किलो बॅग.

         या अनुदानित दराने एका शेतकऱ्याला 5 एकर पर्यंतचे अनुदानीत दराने बियाणे महाबीज विक्रेते व उपविक्रेत्यांकडे 7 /12 व आधारकार्डची झेरॉक्स देऊन बियाणे उपलब्ध्‍ होईल तरी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये अनुदानित दराने महाबीजचे तुर व उडीद पिकाच्या विविध वाणाचे बियाणे खरेदी करावे असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी कृषी विभाग लातूर व जिल्हा व्यवस्थापक महाबीज लातूर यांनी केले आहे.

                                                                     0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु