आजी / माजी सैनिक, युध्द विधवा व माजी विधवाच्या मुलींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन

 

आजी / माजी सैनिक, युध्द विधवा व माजी विधवाच्या

मुलींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन

       लातूर,दि.17(जिमाका)- लातूर येथे आधुनिक पध्दतीच्या सर्व सोयी उपलब्ध्‍ असलेले स्वच्छ व सुंदर असे माजी सैनिक मुलींचे वसतीगृह आहे. या वसतीगृहात लातूर येथे शिक्षण घेणाऱ्या माजी व आजी सैनिक व विधवांच्या मुलींना तसेच वसतिगृहात जागा शिल्लक राहिल्यास नागरी जीवनातील मुलींना प्रवेश दिला जाईल. प्रवेश प्रक्रिया दिनांक 20 जून 2022 पासून सुरु करुन प्रवेश पुस्तिका वाटप करण्यात येत आहे. तरी सर्व आजी / माजी सैनिक, युध्द विधवा व माजी विधवाच्या मुलींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

तसेच या वसतिगृहात पूढील प्रमाणे नमुद केलेल्या सुविधा उपलब्ध्‍ आहेत. उत्तम भाजन व्यवस्था, राहण्याची सर्व साय, अभ्यासिका व वाचनालयाची सोय, खेळांची सोय आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून भोजन व निवास भाडे नवीन दर प्रति महिना पूढील प्रमाणे ठरविण्यात आले आहेत. सेवारत सैकिन अधिकारी 1000 जेसीओ 900 सिपाई/ एनसीओ 700 व माजी सैनिक अधिकारी 900 जेसीओ 800 शिपाई / एनसीओ 600 व नागरी पाल्य 2250 असे आहे.

नोट - युध्द विधवा व माजी सैनिक विधवांचे सर्व मुलींना राहण्याची / भोजन व्यवस्था नि:शुल्क आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया ही वसतीगृह प्रवेश नियम व अटीमधील नमूद प्राधान्यक्रमाणे प्रवेश निश्चित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी वसतिगृह अधिक्षीका, माजी सैनिक मुलींचे वसतिगृह, लातूर येथे सपंर्क साधावा. कार्यालयीन टेलीफोन क्र. 02382-228544 असा आहे.                                   

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु