क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी २० एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी २० एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. १६ : विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कला, समाजप्रबोधन आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार प्रदान करण्याचा शासन निर्णय १३ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्यातील पात्र साहित्यिक, समाजप्रबोधनकार, समाजसेवक आणि संस्थांनी २० एप्रिल २०२६ पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले आहे. विहित नमुन्यातील हे प्रस्ताव तीन प्रतीत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, लातूर या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना आणि पुरस्काराच्या अधिक माहितीसाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन