सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी मासिक विवरणपत्र 31 एप्रिलपूर्वी ऑनलाईन सादर करणे बंधनकारक

सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी मासिक विवरणपत्र 31 एप्रिलपूर्वी ऑनलाईन सादर करणे बंधनकारक लातूर दि. 01 : सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांना कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1 प्रत्येक तिमाही संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत ऑनलाईन सादर करणे सेवायोजन कार्यालये रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणारा अधिनियम 1959 व त्याअंतर्गत नियमावली 1960 नुसार बंधनकारक असल्याने विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र व राज्य शासन, अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना ईआर-1 विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सेवायोजन कार्यालयाचे https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नियोक्त्यांच्या लॉगइन मध्ये ईआर-1 सादर करताना पोर्टलवर एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब) वर क्लीक करुन एम्प्लॉयर लॉगइन मध्ये युजर आयडी व पासवर्ड वापरुन लॉगईन करुन डॅशबोर्डवरील ईआर-1 ऑप्शनवर क्लीक करावे, त्यानंतर एंटर ईआर-1 वर क्लीक करुन तिमाही विवरणपत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करता येईल. याचा वापर करुन 30 एप्रिल, 2026 अगोदर ईआर-1 विवरणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी केले आहे. हे विवरणपत्र सादर करताना काही तांत्रिक अडचण आल्यास 02382-299462 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन