नांदेड येथे ३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड येथे ३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन लातूर, दि. २७ : महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील शेतकरी, लघुउद्योजक व सुशिक्षित बेरोजगारांना स्वावलंबी बनवून त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता नांदेड येथील श्री शंकरराव चव्हाण सभागृह, विष्णुनगर येथे भव्य ‘कर्ज वाटप व स्वयंरोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाज्योती आणि वनार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्यात लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध महामंडळांच्या कर्ज योजना, प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जातील त्रुटी कशा टाळाव्यात, यावर सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन दिले जाईल. या विशेष सोहळ्यात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना सशर्त हेतुपत्र (एलओआय), मंजुरी पत्रे, प्रशस्तीपत्रे व मेडलचे वाटप करण्यात येणार असून ट्रॅक्टर व इतर वाहनांचेही वितरण केले जाणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक सौदारजी नारायण झुंझारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स्थित जिल्हा कार्यालयाशी (संपर्क: ०२३८२-२५३३३४) संपर्क साधावा *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन