विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 03 एप्रिल रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 03 एप्रिल रोजी बंद राहणार लातूर, दि. 02 (जिमाका) : गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवार, 3 एप्रिल, 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग शुक्रवार, 03 एप्रिल, 2026 रोजी बंद राहील. तसेच शनिवार, 4 एप्रिल, 2026 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील. *****

Comments

Popular posts from this blog

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित