सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर जिल्हा दौरा
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर, दि. १६ : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सहकार मंत्री श्री. पाटील यांचे सकाळी १०.३० वाजता शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी' निवासस्थान येथून अहमदपूर तालुक्यातील माकणीकडे प्रयाण करतील. सकाळी १०.४५ वाजता ते माकणी येथे कै. बालासाहेब वाघमोडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी १२ वाजता धानोरा तीर्थ येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या गुलाल उधळण कार्यक्रमास ते उपस्थिती लावणार आहेत.
दुपारी १२.३० वाजता शिरूर ताजबंद येथूनच ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पाणी टंचाई आढावा बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता शिरूर अनंतपाळ येथील हॉटेल आशा येथे आयोजित सत्कार समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर शिरूर अनंतपाळ येथील इंद्रायणी निवास येथे आगमन व मुक्काम.
Comments
Post a Comment