एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे धडे मिळणार; १५ एप्रिल रोजी ‘डिजिटल शेती शाळा’ उपक्रमाचे आयोजन

एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे धडे मिळणार; १५ एप्रिल रोजी ‘डिजिटल शेती शाळा’ उपक्रमाचे आयोजन लातूर, दि. १० : हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जात शेतीला अधिक शाश्वत आणि समृद्ध करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग महाराष्ट्र राज्य, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता ‘डिजिटल शेती शाळा भाग-३’ चे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात प्रामुख्याने ‘एकात्मिक कीड व्यवस्थापन’ या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार असून, यामध्ये सापळा पिकांची लागवड, जैविक व नैसर्गिक कीड व्यवस्थापन, शेतात पक्षी थांबे उभारणे, चिकट सापळ्यांचा वापर आणि मित्र कीटकांचे संवर्धन यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे. या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीत योग्य वापर कसा करावा, याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याने सर्व शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी गट, एफपीओ आणि महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी आपल्या भागातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, समूह सहाय्यक किंवा कृषी ताई व कृषी सखी यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या विशेष डिजिटल शेती शाळेत सहभागी होण्याचे आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत