लातूर जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

लातूर जिल्ह्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ लातूर, दि. ६ (जिमाका): हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार लातूर जिल्ह्यात नाफेडच्या वतीने सुरू असलेल्या चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रियेला आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी एम. व्ही. वाजपेयी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. लातूर जिल्ह्यात चना खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया १ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली होती. यापूर्वी नोंदणीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी शासनाने ऑनलाईन नोंदणीचा कालावधी वाढवून आता १५ एप्रिल २०२६ पर्यंत केला आहे. शासनाने दिलेल्या विहित कालावधीतच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. ही नोंदणी प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून, कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. लातूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली नोंदणी केलेली नाही, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन त्वरित ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पणन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत