लातूर येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्तपोलीस मुख्यालय प्रांगणात होणार राष्ट्रध्वज वंदन  

लातूर येथे १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्तपोलीस मुख्यालय प्रांगणात होणार राष्ट्रध्वज वंदन   लातूर, दि. २७ : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार आहे. या मुख्य शासकीय समारंभाचे आयोजन बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय प्रांगणावर करण्यात आले आहे.याप्रसंगी राष्ट्रध्वज वंदन आणि भव्य संचलन (परेड) पार पडणार आहे. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व नागरिकांनी राष्ट्रीय किंवा समारंभीय पोषाख परिधान करावा. तसेच, सर्व निमंत्रितांनी सोहळा सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर कार्यक्रमस्थळी आसनस्थ व्हावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी ८ वाजता होईल. या समारंभात सर्वांना सहभागी होता यावे, यासाठी इतर कार्यालये किंवा संस्थांनी १ मे रोजी सकाळी ७.१५ ते ९ या वेळेत राष्ट्रध्वजवंदन किंवा इतर कोणतेही शासकीय समारंभ आयोजित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या कार्यालयाला किंवा संस्थेला स्वतंत्रपणे ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास तो सकाळी ७.१५ पूर्वी किंवा सकाळी ९ नंतर आयोजित करावा.***** 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन