लातूर येथे ९ एप्रिल रोजी 'जागेवरच निवड संधी' रोजगार मेळाव्याचे आयोजन

लातूर येथे ९ एप्रिल रोजी 'जागेवरच निवड संधी' रोजगार मेळाव्याचे आयोजन लातूर: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय 'जागेवरच निवड संधी' (प्लेसमेंट ड्राईव्ह) मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाच्या परिसरात होईल. या मेळाव्यामध्ये नामांकित आस्थापना व उद्योजक सहभागी होणार असून १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, आय.टी.आय. आणि डिप्लोमाधारक उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे, स्वतःचा रिझ्युम आणि पासपोर्ट फोटोच्या तीन प्रतींसह जिल्हा क्रीडा संकुल समोरील शासकीय तंत्र प्रशाला केंद्र येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त नि. ना. सूर्यवंशी यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास