लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन

लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापन लातूर, दि. २० : खरीप २०२६ हंगामाच्या अनुषंगाने शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या या कार्यालयातील गुण नियंत्रण कक्षात नितीन सोनटक्के यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली असून, कोणत्याही तक्रारीसाठी अथवा माहितीसाठी त्यांच्याशी ८२७५४८७४०० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. या कक्षाच्या कामकाजासाठी तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) बी. बी. मुंडे (भ्रमणध्वनी क्र. ७८२१८३०९०७) आणि विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ए. एन. तिडके (भ्रमणध्वनी क्र. ९६०४८८३०८५) हे समन्वयक म्हणून कार्यरत राहतील. शेतकरी, वितरक किंवा विक्रेते यांना कृषी निविष्ठांच्या दर्जाबाबत काही शंका असल्यास अथवा तांत्रिक अडचणी असल्यास त्यांनी या कक्षाशी किंवा कृषी विभागाच्या १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन