लातूर येथे नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे १८ एप्रिल रोजी भूमिपूजन
लातूर येथे नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे १८ एप्रिल रोजी भूमिपूजन
• पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार भूमिपूजन
• सहकार मंत्री बाबासाहेब पाटील भूषवणार अध्यक्षपद
लातूर, दि. १६: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लातूर येथील १०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालय इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून, या नवीन वास्तूचा भूमिपूजन समारंभ शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
नवीन वास्तूचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील राहणार आहेत. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित राहणार आहेत, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व महिला बालविकास राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
याप्रसंगी विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, जि.प. अध्यक्षा उषाताई पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, महापौर जयश्री सोनकांबळे, लातूर पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले आणि महाराणा प्रतापनगरच्या सरपंच संगिता पतंगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना आणि मनपा आयुक्त मानसी मीना यांसह विविध विभागांचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या महत्त्वपूर्ण सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे,यांनी केले आहे.
**
Comments
Post a Comment