लातूर येथे २ ते ११ मे दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर; १६ खेळांच्या प्रशिक्षणाची खेळाडूंना संधी

लातूर येथे २ ते ११ मे दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर; १६ खेळांच्या प्रशिक्षणाची खेळाडूंना संधी लातूर, दि. २७ (जिमाका): जिल्हा क्रीडा कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी २ ते ११ मे २०२६ या कालावधीत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथे होणाऱ्या या शिबिरात क्रिकेट, खो-खो, कुस्ती, ॲथलेटिक्स, रायफल शूटिंग, लॉन टेनिस, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, बॉक्सिंग, कराटे, स्केटिंग, योगा आणि बास्केटबॉल अशा एकूण १६ क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी जयराज मुंढे (भ्रमणध्वनी क्र. ८२७५२७३९१७) किंवा क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर (भ्रमणध्वनी क्र. ९४२०२९२१५५) यांच्याशी संपर्क साधावा. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन