महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी २० एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी
२० एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि. १६ : वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी, कला, समाजप्रबोधन आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शासन निर्णय ८ मार्च २०१९ नुसार, प्रतिवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एक व्यक्ती व एक संस्था अशा दोन घटकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
या पुरस्कारासाठी लातूर जिल्ह्यातील पात्र व्यक्ती व संस्थांनी आपले प्रस्ताव विहित नमुन्यात तीन प्रतीत येत्या २० एप्रिल २०२६ पर्यंत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, लातूर यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले आहे. पुरस्काराचा विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयात उपलब्ध असून अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment