लातूर शहर व ग्रामीण मतदार संघात 'एसआयआर मॅपिंग'चे काम सुरू; मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन

लातूर शहर व ग्रामीण मतदार संघात 'एसआयआर मॅपिंग'चे काम सुरू; मतदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन लातूर, दि. १६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राज्यात लवकरच 'विशेष सखोल पुनरिक्षण' (एसआयआर - स्पेशल इन्टेसिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून २३४-लातूर ग्रामीण व २३५-लातूर शहर विधानसभा मतदार संघातील सर्व 'बीएलओ'मार्फत सध्या 'एसआयआर मॅपिंग'चे कामकाज सुरू आहे. हे कामकाज कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असल्याने, दोन्ही मतदार संघांतील सर्व बीएलओ यांना दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत त्यांच्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून मॅपिंगचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी २३५-लातूर शहर व २३४-लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी १६ एप्रिल २०२६ पासून सायंकाळी ५ ते ७ या वेळेत आपल्या संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून एसआयआर मॅपिंग करून घ्यावे, असे आवाहन लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे व तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत