पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर जिल्हा दौरा लातूर, दि. १६: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे १६ ते १८ एप्रिल २०२६ या तीन दिवसांच्या लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम. पालकमंत्री श्री. भोसले हे शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे लातूर जिल्ह्यातील विविध विकास कामे व संभाव्य पाणी टंचाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता ते उदगीरकडे प्रयाण करतील. सकाळी १० वाजता उदगीर येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल येथे आयोजित अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या ४४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता लातूर येथील नांदेड रोडवरील कृषि महाविद्यालय परिसरात नवीन जिल्हा रुग्णालय इमारत बांधकामाचे भूमिपूजन होईल. त्यानंतर सोयीनुसार लातूर येथून साताराकडे प्रयाण करतील. **

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन