दिशा अभियानात लातूर जिल्ह्यातील चार शाळांचा राज्यस्तरावर गौरव

दिशा अभियानात लातूर जिल्ह्यातील चार शाळांचा राज्यस्तरावर गौरव लातूर, दि. ६ (जिमाका): दिशा अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल लातूर जिल्ह्यातील चार शाळांची राज्य स्तरावर निवड करण्यात आली आहे. या निवडीचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या हस्ते संबंधित मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आले. या अभियानाअंतर्गत लातूर येथील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह, जीवन विकास प्रतिष्ठान मतिमंद विद्यालय, पांडूरंग निवासी मतिमंद विद्यालय आणि चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील संत गाडगेबाबा निवासी मतिमंद विद्यालय या शाळांचा समावेश आहे. वर्षभरात अभ्यासक्रम व अध्यापनात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्याध्यापक अण्णासाहेब कदम, भरत देवकते, शिवप्रसाद भंडारे आणि पंडित लव्हरे यांना राहुलकुमार मीना यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हे यश मिळवताना या शाळांनी विविध निकष पूर्ण केले आहेत, ज्यामध्ये शालेय वेळापत्रकाचे पालन, शिक्षक व विद्यार्थी पुस्तिकांचा प्रभावी वापर, शैक्षणिक साहित्याचा विनियोग आणि शिकवण्याची बहुउद्देशीय पद्धत यांसारख्या बाबींचा समावेश होता. या निकषांची परिपूर्ण पूर्तता केल्यामुळेच जिल्ह्यातील या चार शाळा पात्र ठरल्या आहेत. या गौरव सोहळ्याप्रसंगी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता डॉ. राजू गायकवाड, सहायक सल्लागार बाळासाहेब वाकडे आणि दिशा अभियानचे लातूर विभागीय समन्वयक साजिद मुल्ला यांची उपस्थिती होती. ****

Comments

Popular posts from this blog

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित