नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी २० एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी २० एप्रिलपर्यंत
प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
लातूर, दि. १६ : विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पारंपरिक लोककलाकार आणि कारागिरांच्या कौशल्याचा गौरव करण्यासाठी नटराज व विश्वकर्मा पुरस्कार देण्याचा शासन निर्णय १३ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आला आहे. या अंतर्गत सामाजिक, कलात्मक व प्रबोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोककलावंतांना 'नटराज पुरस्कार' आणि पारंपरिक कारागिरांना 'विश्वकर्मा पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांसाठी लातूर जिल्ह्यातील पात्र लोककलावंत व कारागिरांनी आपले प्रस्ताव २० एप्रिल २०२६ पर्यंत तीन प्रतीत 'सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, लातूर' यांच्या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहायक संचालक अभय अटकळ यांनी केले आहे. अर्जाचा विहित नमुना व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी प्रत्यक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाद्वारे कळविण्यात आले आहे.
*****
Comments
Post a Comment